Farmer viral Video : आपल्या शेतात पिकलेला माल विकण्यासाठी शेतकरी विविध क्लुप्त्या वापरत असतात. ग्राहकांना आपल्या शेतमालाकडे आकर्षित करुन घेण्यासाठी ते प्रयत्न करत असतात. असाच एका शेतकऱ्याचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलच व्हायरल होत आहे. हा शेतकरी आपली लिंबू विकण्यासाठी, बाजारपेठेतील ग्राहकांचे लक्ष वेधण्यासाठी मोठ्यानं ओरडत असल्याचे दिसत आहे. शेतकऱ्यांची व्यथा मांडणारा एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

  


नेमकं काय म्हटलं होतं शेतकऱ्यानं


बार्शी तालुक्यातील वैरागच्या बाजारातील हा व्हीडिओ असल्याचे संभाषनावारुन समोर आलं आहे. बाजारात लिंबू विकत असलेल्या शेतकऱ्याने आपली व्यथा सांगितली आहे. 'लिंबू 10 रुपयाला दोन, घेतंय का कोण? का लावू शरद पवारांना फोन, 10 एकर बागायत हाय पण पोराला पोरगी कोणी देईना' असे म्हणत शेतकऱ्याने ग्राहकांचे लक्ष वेधून घेतले आहे. या संवादातून या शेतकऱ्याने आपली व्यथा मांडली आहे. या शेतकऱ्याचे अद्याप नाव समजलेले नाही मात्र, हा व्हीडिओ चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे.


 



शेतकऱ्यांसमोर विविध समस्या


सध्या राज्यात एकिकडे उन्हाचा चटका वाढत आहे. तापमान वाढीमुळे राज्यातील नागरिक हैराण झाले आहे. या तापमान वाढीचा पिकांवर देखील परिणाम होत असल्याचे चित्र दिसत आहे. तर दुसरीकडे काही ठिकाणी अवकाळी पाऊस देखील पडत असल्याचे चित्र दिसत आहे. या अवकाळी पावसाचा मोठा फटका फळबागांना बसला आहे. तसेच भाजीपाला पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. अशातच कांद्याच्या दराचा प्रश्न देखील उपस्थित झाला आहे. सद्या कांद्याला खूप कमी दर मिळत आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. तसेच अतिरिक्त उसाचा प्रश्न देखील निर्माण झाला आहे. राज्यात अनेक ठिकाणी ऊस शेतातच उभा असल्याचे चित्र दिसत आहे. शेतमालाला मिळणारा कमी दर आणि वाढत जाणारा उत्पादन खर्च यामुले शेतकरी संकटात सापडला आहे. दुसरीकडे खतांच्या किंमती देखील वाढल्या आहेत. त्यामुळे उत्पादन खर्च वाढला आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे.


महत्वाच्या बातम्या: