Farmer Income Tax: शेतकरी Income Tax भरत नाही म्हणणाऱ्यांना खणखणीत चपराक, नाशिकच्या शेतकऱ्यांनी भरला तब्बल 218 कोटींचा कर; सह्याद्री फार्म्सची राज्यात चर्चा
Farmer Income Tax: नाशिकच्या शेतकऱ्यांनी सरकारच्या तिजोरीत कोट्यवधी रुपयांच्या कराचा भरणा करून शेतकरी आयकर भरत नाहीत, अशी ओरड करणार्यांना खणखणीत उत्तर दिले आहे.

Farmer Income Tax : राज्यात सर्वत्र हाहाकार माजविणाऱ्या पावसानं (Rain) बळीराजा हवालदिल झालाय. लाखो हेक्टर शेती वाहून गेलीय. शेकडो कोटी रुपयांची पिकं जमीनदोस्त झालेत. पुन्हा एकदा स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी शेतकरी सरकारी मदतीकडे डोळे लावून बसलाय. याच परिस्थितीत नाशिकच्या शेतकऱ्यांनी (Farmers) मात्र सरकारच्या तिजोरीत कोट्यवधी रुपयांच्या कराचा (Income Tax) भरणा करून शेतकरी आयकर भरत नाहीत, अशी ओरड करणार्यांना खणखणीत उत्तर दिले आहे.
मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रासह सर्वत्र गेल्या महिन्याभरापासून पावसाचे धुमशान सुरू आहे. आजवर पावसाचा असा कहर बघितला नसल्याचे जूने जाणते सांगतात. नाशिक जिल्ह्यात तर मे महिन्यापासून सुरू झालेला पाऊस ऑक्टोबर महिन्यात देखील हजेरी लावत असल्याने पाऊस पडावा म्हणून साकडे घालणारे हात आता पाऊस थांबवा याची प्रार्थना करण्यासाठी जोडले जात आहेत.
Farmer Income Tax: वर्षभरात 1955 कोटी रुपयांची उलाढाल
तर या कठीण परिस्थितीत देखील नाशिकची शेतकरी कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सह्याद्री फार्म्स कंपनीने 85 कोटी रुपयांचा कराचा भरणा सरकारी तिजोरीत केला असून त्यापैकी 54 कोटी रुपयांचा आयकर भरला आहे. वर्षभरात 1955 कोटी रुपयांची उलाढाल केली असून 99.7 म्हणजे जवळपास 100 कोटी रुपयांचा घसघशीत नफा कमवित राज्यातील शेतकऱ्यांसमोर मोठा आदर्श निर्माण करत शेतकरी कराचा भरणा करत नाहीत अशी ओरड करणार्यांना चांगलीच चपराक दिली आहे.
Farmer Income Tax: आतापर्यंत शेतकऱ्यांनी भरला 218.4 कोटी रुपये कर
या कराच्या व्यतिरिक्त शेतकरी आपल्या शेतात जे जे उपकरणे घेतो, खत, औषधे घेतो, त्यावरील जीएसटीसह इतर करांचा भरणा हा करतच आलाय. साधारणपणे एक एकरच्या द्राक्ष बागेसाठी शेतकरी एकरी 36 हजार रुपयांचा टॅक्स सरकारच्या तिजोरीत जमा करतो. राज्यभरातील द्राक्ष उत्पादकांचा एकूण 1300 ते 1400 कोटी कराचा भरणा केला जात आहे. सरकारने नवीन आयकरचे स्लॅब तयार केले. त्यात 12 लाख रुपयांचे उत्पन्न माफ केले. शेतकऱ्यांचे उत्पन्न दोन ते तीन लाख रुपयांपर्यंत आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांचे उत्पन्न 12 लाखांपेक्षा जास्त जावो आणि सरकारला कर भरो, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. तर आतापर्यंत शेतकऱ्यांनी 218.4 कोटी रुपये कर भरला आहे.
Maharashtra Rains: शेतकऱ्यांना सावरण्यासाठी सरकार काय पावले उचणार?
दरम्यान, यंदा नाशिकच्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार असून 30 टक्क्याने उत्पन्न घटण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यातून शेतकऱ्यांना सावरण्यासाठी सरकार काय पावले उचणार? याकडे लक्ष लागले आहे. तर दुसरीकडे सरकारनं शेतीला कृषि उद्योग म्हणून सवलती दिल्या पाहिजे. शेती क्षेत्रात सरकारने मोठी गुंतवणूक करण्याची गरज व्यक्त होत आहे. मात्र आजच्या निराशाजनक परिस्थितीत नाशिकचा शेतकरी आयकर भरण्या इतपत उत्पन्न कमवितो हाच सकारात्मक विचार कृषि अर्थव्यवस्था पुढे नेत असल्याचा संदेश मिळत आहे.
आतापर्यंत भरलेला कर - 218.4 कोटी
यावर्षी भरलेला कर - 85.5 कोटी (54.0 कोटी आयकर)
यावर्षीची उलाढाल - 1955 कोटी (2025)
एकूण नफा - 99.7 कोटी (2025)
एकूण रोजगार - 7036
आणखी वाचा


















