Swabhimani Shetkari Saghtana : एक जुलै रोजी कृषी दिनाचे औचित्य साधून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या (Swabhimani Shetkari Saghtana) वतीनं राज्यात शेतकरी जनजागृती अभियान सुरू करण्यात येत आहे. या अभियानाची सुरुवात रायगड वरून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून करण्यात येणार आहे. एक जुलै ते 30 सप्टेंबरपर्यंत हे शेतकरी जनजागृती अभियान चालणार आहे.  


शेतकऱ्यांना उभं करण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं


शेतकरी ज्या वेळेला संकटात उभा होता, तेव्हा त्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहून खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना उभं करण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केले. पहिली कर्जमाफी , दुष्काळामध्ये शेतकऱ्यांना बी -बियाणे ,अनुदान देणे. गोदामाची कोठारी उभा करणे, बैल जोडी , बंधारे , विहीरी , शेती साहित्य यासारख्या वस्तू मोफत वाटणे यामाध्यमातून पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या. आजचे राज्यकर्ते मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होतात मात्र त्यांच्या कार्याचे अनुकरण करत नाहीत हे दुर्दैव म्हणावे लागेल असे राजू शेट्टी (Raju Shetti)  म्हणाले. 


30 सप्टेंबरनंतर राज्यामध्ये मोठ्या आंदोलनाची घोषणा 


आज देशातील आणि राज्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. तोट्याची शेती झाल्यानं शेतकरी आत्महत्येचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. शेतकरी विरोधी धोरणे राज्यकर्ते राबवत आहेत. त्यामुळं शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च न निघाल्याने आर्थिक गणित कोलमडले आहे. याकरता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्व कार्यकर्ते एक जुलैपासून संपूर्ण राज्यात सर्व पिकांचा उत्पादन खर्च, मिळणारा भाव आणि वाढलेल्या महागाईमुळं शेती उत्पादनावर झालेला परिणाम या सर्व गोष्टींची शिवारापासून ते गावातील वाडी वस्तीपर्यंत सभा बैठका घेऊन अभियानाच्या माध्यमातून जनजागृती केली  जाणार आहे. यानंतर 30 सप्टेंबरनंतर राज्यामध्ये मोठ्या आंदोलनाची घोषणा करण्यात येणार आहे. 


छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून अभियानाची सुरुवात


या अभियानासाठी राज्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्व कार्यकर्ते 30 जून रोजी सायंकाळी रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचड या ठिकाणी एकत्रित येणार आहेत.  एक जुलै रोजी पहाटे सहा वाजता रायगडावरती जाण्यास सुरुवात करून गडावरती पोहोचून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून या अभियानाची सुरुवात करणार आहोत. 


महत्वाच्या बातम्या: