... तर साखर कारखाने बंद होतील, एकही कारखाना शेतकऱ्यांना FRP देऊ शकणार नाही, नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) साखर कारखान्यांनी जर इथेनॉल ब्लेंडिग बंद केले तर कारखाना एकाही शेतकऱ्यांना FRP देऊ शकणार नाहीत असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले.
Devendra Fadnavis : आज साखर कारखाने (Sugar Factory) एकाच कारणाने चालतात ते म्हणजे इथेनॉल ब्लेंडिंग (Ethanol Blending) होत आहे. जर इथेनॉल ब्लेंडिग बंद केले तर कारखाना एकाही शेतकऱ्यांना FRP देऊ शकणार नाही. तसेच एकही कारखाना कर्ज परत करु शकणार नाही, कारखाने बंद होतील असे मत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी व्यक्त केले. इथेनॉल जर आपण उद्या बंद केलं तर शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होईल. शेतकरी हा 100 टक्के इथेनॉल तयार करणारा असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.
शेतकऱ्यांचे नुकसान झाले तर कोण भरुन देणार
दरम्यान, इथेनॉल जर उद्या आपण बंद केलं किंवा इथेनॉलवर जर अशा पद्धतीनं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं तर सगळ्यात मोठं नुकसान शेतकऱ्याचं होणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. 100 टक्के इथेनॉल तयार करणारा शेतकरी आहे. शेतकऱ्यांचे नुकसान झाले तर कोण भरुन देणार आहे. 100 टक्के इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या, 50 टक्के इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या, जगभरात इथेनॉलवर गाड्या चालतात. तिथल्या गाड्यात काही अडचण येणार नाही असे मुख्यमंत्री म्हणाले. इथेनॉलच्या विरोधात नॅरेटीव्ह तयार करण्याच्या पाठीमागे कोण कोण आहे, याचा विचार करावा लागेल, भारताला कुठेही प्रगती केली काही लोकांची दुकाने बंद होतात असेही मुख्यमंत्री म्हणाले.
आपण ट्रिलियनच्या खूप जवळ आहोत
अनेक राज्ये 1 ट्रिलियन डॉलर इकोनॉमी होण्याचे स्वप्न बघत आहेत. पण आज त्या स्वप्नाच्या जवळ कोण असेल, तर केवळ महाराष्ट्र आहे, कारण आपण 660 बिलियनवर पोहोचलो आहोत. आपण ट्रिलियनच्या खूप जवळ आहोत. आपण शाश्वत विकास दर ठेवला, तर निश्चितपणे 2030 मध्ये आपण 1 ट्रिलियन डॉलर इकोनॉमी बनवू. असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. जगातल्या अर्थव्यवस्था बघितल्या तर त्या दोन टक्क्यांनी, अडीच टक्क्यांनी विकसित होत आहेत. तसेच इतकं मोठं तेलाचं संकट आल्यानंतर देखील भारत 7.8 टक्क्यांनी आणि महाराष्ट्र 8.8 टक्क्यांनी ग्रोथ करत आहे. आताच्या परिस्थितीत 8.8 टक्के हा चांगला विकासदर आहे, पण आमचा प्रयत्न हा निश्चितपणे असा असेल की, आपण 10 टक्क्यांच्या वर गेलो पाहिजे. असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले. मुंबईकर मेट्रोच्या प्रेमात आहेत. मात्र आपली मुंबई लोकल अजूनही जूनीच आहे. त्यामुळे केंद्र सरकार आणि राज्य सरकारने मिळून मेट्रोसारखे डब्बे मुंबई लोकलसाठी तयार करावे, असं ठरवले. आता 2029 पर्यंत सर्व लोकल ट्रेन मेट्रोसारख्या होतील. दरवाजे बंद होणाऱ्या लोकल असतील. यामध्ये सेकंड क्लासमध्ये एसी देखील असणार आहे. एसी दिल्यानंतरही सेकंड क्लासचं भाडं आहे, तसेच राहील. त्यात वाढ होणार नाही असेही मुख्यमंत्री म्हणाले.






















