Onion : गेल्या चार दिवसांपासून नाशिक (Nashik) जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव (Onion auctions) बंद आहेत. कांदा निर्यातमूल्य रद्द करावे या मागणीसाठी कांदा व्यापाऱ्यांनी लिलाव बंद केले आहेत. व्यापारी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत लिलाव सुरू होणार नाहीत अशी भूमिका व्यापाऱ्यांनी घेतली आहे. मात्र, याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसतोय.
सध्या कांद्याच्या मुद्यांवरुन मोठी कोंडी झाल्याचे पाहायला मिळत आहे. निर्यातमूल्य रद्द करावे या मागणीसाठी व्यापाऱ्यांनी बेमुदत संपाच हत्यार उपसलं आहे. गेल्या चार दिवसांपासून कांद्याचे लिलाव बंद ठेवण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर सणासुदीच्या काळातच कांद्याचे लिलाव ठप्प झाल्यानं शेतकऱ्यांतं मोठं नुकसान होत आहे. त्यामुळं कांद्याचे लिलाव कधी सुरु होणार असा प्रश्न उपस्थित केला जातोय.
पालकमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीनंतरही तोडगा नाही
नाशिकमध्ये (Nashik) कांदा व्यापारी असोसिएशनकडून बुधवारपासून बंदची हाक देण्यात आली आहे. पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या बैठकीनंतरही तोडगा निघालेला नाही. अशातच काल या सर्व घडामोडींवर व्यापारी संघटनांनी बैठक घेत चर्चा केली. मात्र दोन-अडीच तास चाललेल्या या बैठकीतूनही निर्णय झाला नाही. केंद्र सरकारने महाराष्ट्रातील कांद्याबाबत उदासीन असून निर्यातशुल्क वाढवून व्यापाऱ्यांवर अन्याय केला जात आहे, तो कदापि सहन करणार नाही, अशी भूमिका व्यापाऱ्यांनी घेतली आहे. जोपर्यंत राज्य सरकार ठोस निर्णय घेत नाही, तोपर्यंत कांदा लिलावात (Onion Auction) सहभागी होणार नाही, बंद असाच सुरु राहील असा निर्णय व्यापाऱ्यांनी घेतलाय.
विविध मागण्यांचे राज्य सरकारला निवेदन
दरम्यान कांदा व्यापारी संघटनेकडून केंद्र सरकारने सुरू केलेली 40 टक्के निर्यात शुल्क कमी (Export duty) करणे, यासह स्थानिक बाजार समितीमध्ये सुरू असलेले कर कमी करावे आदींसह वेगवेगळ्या मागण्यांचे निवेदन यापूर्वीच राज्य सरकारला पाठवले आहे, तसेच जिल्हा प्रशासना प्रशासनाला देखील दिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या: