Devendra Fadnavis : शेतकऱ्यांना (Farmers) आम्ही दिवसा 12 तास वीज (electricity) देणार आहोत. पुढच्या वर्षात सगळ्या शेतकऱ्यानं 12 तास दिवसा वीज देणार असल्याचा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी व्यक्त केला. बीड जिल्ह्यातील परळीमध्ये शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना फडणनीसांनी आश्वासन दिले. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री धनंजय मुंडे, पंकजा मुंडे यांच्यासह इतर मान्यवरही उपस्थित होते.
वर्षानुवर्षे शेतकऱ्यांना दिवसा अर्धी आणि रात्री अर्धा वीज मिळत आहे. शेतकऱ्याला रात्री अपरात्री शेतात जावं लागतं. पण आपलं सरकार शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीज देणार असल्याचं आश्वासन फडणवीस यांनी दिलं.मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत आपण वीज सोलरवर वीज करत आहोत. त्यामुळं आता 365 दिवस आपण शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीज देण्याचा निर्णय घेतल्याचे फडणवीस म्हणाले.
परळीत आल्यानंतर आम्ही दोन नाथांचं दर्शन घेतलं
परळीत आल्यानंतर आम्ही दोन नाथांचं दर्शन घेतलं. एक प्रभू वैधनाथ आणि दुसरे ज्यांच्या उर्जेमुळं आम्ही राजकारणात आहोत त्या गोपीनाथ मुंडे यांचही दर्शन आम्ही घेतल्याचे फडणवीस म्हणाले. आज धनंजय मुंडे यांनी एक मिरवणूक ठेवली होती. पण ती मिरवणूक झाली असती तर आम्हाला संध्याकाळ पर्यंत व्यासपीठावर पोहोचताच आले नसते असे फडणवीस म्हणाले. कमी पाऊस पडल्यामुळं शेतकऱ्यांना अडचणी निर्माण झाल्या आहेत. यावर्षी आपण शेतकऱ्यांसाठी चांगले निर्णय घेतले आहेत. एक रुपयात पिक विमा योजना सुरु केली आहे. बीड जिल्ह्यात 18 लाख शेतकऱ्यांना 25 टक्के अग्रीम जमा झाले असल्याचे फडणवीस म्हणाले. तसेच आमच्या सोयाबीन आणि कापसाचा भाव देखील वाढला पाहिजे असे फडणवीस म्हणाले.
संकटात अडकलेल्या सर्व शेतकऱ्यांना सरकार पूर्णपणे मदत करणार
संकटात अडकलेल्या सर्व शेतकऱ्यांना सरकार पूर्णपणे मदत करेल असे मत फडणवीस यांनी व्यक्त केले. शेतकऱ्यांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही. शेतकऱ्याला धैर्य यावं, त्याच्या शेतमालाला दर मिळावा हा प्रयत्न सरकार करत आहे. सोयाबीन आणि कापसाच्या प्रश्नाबाबत राज्य सरकार लवकरच केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्यासोबत बैठक करणार आहे. आमच्या शेतमालाला चांगला दर मिळावा ही आमची मागणी असल्याचे फडणवीस म्हणाले.
मराठवाडा दुष्काळ मुक्तीसाठी आम्ही एक मोठं पाऊल उचलणार
पुढच्या काळात मराठवाडा दुष्काळमुक्त करण्यासाठी आमचे सरकार प्रयत्न करणार असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले. दुष्काळमुक्तीसाठी आम्ही एक मोठं पाऊल उचलणार आहोत. जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून देखील चांगलं काम झालं आहे. पुढच्या काळातही बीड जिल्ह्यात या योजनेच्या माध्यमातून चांगल काम होईल असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.
धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे एकत्र राहा, आम्ही तुमच्या पाठीशी
आम्ही तिघे एकत्रित आल्यानंतर आमच्या तिघांचा एकच ध्यास आहे तो म्हणजे महाराष्ट्राचा विकास.
मी मंत्री धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या दोघांनाही विनंती करतो की दोघांनीही असेच एकत्र राहावं आम्ही तिघेही तुमच्या सोबत असल्याचे फडणवी म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या: