PM Kisan yojana : देशातील शेतकऱ्यांना (Farmers) आर्थिक पाठबळ देण्यासाठी केंद्र सरकार दरवर्षी शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांची आर्थिक मदत देते. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या ( PM Kisan yojana) माध्यमातून प्रत्येक चार महिन्याला शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपयांचा हफ्ता जमा होता. आत्तापर्यंत 14 हफ्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहे. आज 15 हफ्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झारखंडमधून या 15 व्या हफ्त्याचे वितरण केलं जाणार आहे. दरम्यान, देशातील अनेक शेतकऱ्यांना या 15 व्या हफ्त्याचा लाभ मिळणार नाही. 


या लोकांना मिळणार नाही PM किसान योजनेचा लाभ 


गेल्या काही दिवसात PM किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत अनेक शेतकऱ्यांची नावे यादीतून काढून टाकण्यात आली आहेत. त्या शेतकऱ्यांना अपात्र घोषित करण्यात आलं आहे. कारण यामध्ये सरकारी कर्मचारी, विद्यमान मंत्री, आमदार, पंचायत प्रमुख आणि 10,000 रुपयांपेक्षा जास्त पेन्शन घेतलेल्या लोकांचा समावेश आहे. या सर्व लोकांना पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 15 वा हफ्ता मिळणार नाही.  शेतकऱ्यांनी चुकीचं बँक खातं दिलं असेल आणि त्यांचं बँक खातं आणि आधार कार्ड यावरील नावात फरक असल्यास असे शेतकरी या योजनेतून बाद होऊ शकतात. अशा शेतकऱ्यांना, शेतकरी सन्मान योजनेचा 15 वा हफ्ता मिळणार नाही. शेतकऱ्यांनी आधार कार्ड, लिंग, पत्ता आदी गोष्टी नोंदवण्यात चूक केली असेल तर असेही शेतकरी या योजनेपासून वंचित राहू शकतात. ज्या शेतकऱ्यांनी इकेवायसी केली नसेल, त्यांचीही नावं लाभार्थ्यांच्या लिस्टमधून बाहेर काढली जातील. सर्व शेतकऱ्यांना इकेवायसी करणं बंधनकारक आहे. 


आत्तापर्यंत मिळाले 14 हफ्ते


देशातल्या शेतकऱ्यांना आर्थिक फायदा व्हावा, या उद्देशाने पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना राबवण्यात येते. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात भारत सरकार पैसे पाठवतं. हे पैसे किती आहेत ते आधीच ठरलेलं असतं. शेतकऱ्यांच्या कमाईत केंद्र शासन याद्वारे हातभार लावण्याचा प्रयत्न करत असतं. आजवर याच्या 14 टप्प्यांमध्ये देशातल्या शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळाला आहे.आता शेतकरी याच्या 15 व्या टप्प्याची वाट पाहात आहेत.


आठ कोटी शेतकऱ्यांना मिळणार लाभ 


आज पंतप्रधान नरेंद्र मोदी PM किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 15 वा हप्ता जारी करतील. पंतप्रधान आज 'आदिवासी गौरव दिना'च्या निमित्ताने झारखंडमधील बिरसा कॉलेज, खुंटी येथून योजनेचा पुढील हप्ता जारी करतील. पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत एकूण 8 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये हस्तांतरित केले जातील.


18,000 कोटी रुपयांची रक्कम हस्तांतरित होणार


केंद्रातील मोदी सरकार देशातील प्रत्येक घटकासाठी विविध योजना आणत आहे. त्यापैकी एका योजनेचे नाव आहे पीएम किसान सन्मान निधी योजना. या योजनेंतर्गत दरवर्षी 2000-2000 हजार रुपयांचे एकूण तीन हप्ते गरीब शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केले जातात. आज सरकार या योजनेअंतर्गत 15 वा हप्ता जारी करणार आहे. या योजनेद्वारे पंतप्रधान मोदी 8 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 18,000 कोटी रुपयांची रक्कम हस्तांतरित करणार आहेत. ही रक्कम थेट लाभ हस्तांतरणाद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केली जाईल. ही योजना 24 फेब्रुवारी 2019 रोजी केंद्र सरकारने सुरू केली होती. या योजनेद्वारे आतापर्यंत 11 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात 2.61 लाख कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आले आहेत. याबाबतची माहिती कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी कालच ट्विटरवरून दिली होती.


तुम्हाला योजनेचा लाभ मिळेल का?


तुम्हीही पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी असाल तर सर्वप्रथम तुम्ही तुमची लाभार्थी यादी तपासू शकता.
यासाठी पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in/ ला भेट द्या.
पुढे, डॅशबोर्डवर उजव्या बाजूला क्लिक करा.
पुढे तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल.
यामध्ये तुम्हाला तुमचे नाव, जिल्हा, गावाचे नाव इत्यादी सर्व तपशील टाकावे लागतील.
तुमच्या पंचायतीचे नाव देखील इथे टाका.
त्यानंतर शो बटणावर क्लिक करा.
यानंतर तुम्ही तुमचे तपशील येथून तपासू शकता.


महत्त्वाच्या बातम्या:


PM Kisan : खूशखबर! शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच जमा होणार पीएम किसान योजनेचा 15 वा हप्ता, लाभार्थी यादीमध्ये तुमचं नाव तपासा