Copra MSP : 2023 च्या हंगामासाठी केंद्रीय मंत्रीमंडळानं खोबऱ्याच्या किमान आधारभूत किंमतीला मंजुरी (Copra MSP) दिली आहे. सरासरी चांगल्या गुणवत्तेच्या सत्त्व काढण्यासाठीच्या खोबऱ्यासाठी किमान आधारभूत किंमत ही 10 हजार 860 रुपये प्रति क्विंटल निश्चित करण्यात आली आहे. तर गोटा खोबऱ्यासाठी 2023 च्या हंगामासाठी 11 हजार 750 रूपये प्रति क्विंटल किंमत निश्चित करण्यात आली आहे. शुक्रवारी (23 डिसेंबर) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीची बैठक (Cabinet Committee on Economic Affairs) झाली या बैठकीत खोबऱ्याच्या किमान आधारभूत किमतींना (MSP) मंजुरी देण्यात आली.
सरासरी उत्पादन खर्चाचा विचार करुन किमान आधारभूत किंमत निश्चित
यंदा सत्व काढण्यासाठी नारळाच्या दरामध्ये (Coconut Price) प्रति क्विंटल 270 रुपयांची वाढ केली आहे. तर मागील हंगामापेक्षा गोटा खोबऱ्याच्या दरामध्ये प्रति क्विंटल 750 रुपयांची वाढ केली आहे. सरासरी उत्पादन खर्चापेक्षा सत्व काढण्याच्या खोबऱ्यासाठी 51.82 टक्के आणि गोटा खोबऱ्यासाठी 64.26 टक्के नफा सुनिश्चित करण्यात आला आहे. 2023 च्या हंगामासाठी खोबऱ्याचे घोषित किमान आधारभूत मूल्य हे सरकारने 2018-19 च्या अर्थसंकल्पात घोषित केल्यानुसार अखिल भारतीय भारित सरासरी उत्पादन खर्चाच्या किमान 1.5 पट पातळीवर एमएसपी निश्चित करण्याच्या तत्त्वाशी सुसंगत आहे.
नारळ उत्पादकांना चांगला मोबदला मिळवा हाच उद्देश
नारळ उत्पादक शेतकऱ्यांना चांगला मोबदला मिळवा आणि त्यांच्या उत्पन्नामध्ये भरीव सुधारणा करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे आणि प्रगतीशील पाऊल आहे. नॅशनल ॲग्रिकल्चरल को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अर्थात नाफेड आणि राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ (एनसीसीएफ ) मूल्य समर्थन योजना (पीएसएस) अंतर्गत खोबरे आणि शेंड्या काढून- सोललेल्या नारळाच्या खरेदीसाठी केंद्रीय नोडल एजन्सी (सीएनएएस) म्हणून काम करीत आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
Anil Ghanwat: उत्पादन खर्चाच्या तुलनेत MSP मध्ये केलेली वाढ तुटपुंजी, शेतकर्यांना फायदा होणार नाही, अनिल घनवटांची टीका