Success Story : अलीकडच्या काळात अनेक तरुण नोकरीच्या मागे न लागता विविध व्यवसाय करत आहेत. तर काही जण चांगली नोकरी सोडून शेती करतात. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन भरघोस उत्पादन घेत आहेत. तर काहीजण शेतीबरोबर उत्तम पशुपालन देखील करत आहेत. बिहारमधील अशाच एका तरुणाने सरकारी नोकरीची ऑफर नाकारुन शास्त्रोक्त पद्धतीनं शेती करण्यास सुरुवात केली. या शेतीतून हा तरुण शेतकरी वर्षभरात लाखो रुपयांची कमाई करत आहे. श्रीनिवास कुमार असे या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे.


बिहारच्या लोकांना फक्त नोकरी करायला आवडते असे लोकांना वाटते. पण तसे नाही. आता इतर राज्यांप्रमाणे बिहारमधील तरुणही व्यवसाय आणि शेतीमध्ये रस घेऊ लागले आहेत. याचा तरुणांना मोठा फायदा होत आहे. बिहारमधील एका तरुणाने सरकारी नोकरीची ऑफर नाकारली आणि शास्त्रोक्त पद्धतीने शेती करण्यास सुरुवात केली आहे.  सध्या हा तरुण शेतकरी वर्षभरात लाखो रुपयांची कमाई करत आहे. विशेष म्हणजे या तरुण शेतकऱ्यापासून प्रेरणा घेऊन आता इतर तरुणही शेतीकडे वळत आहेत.


नोकरी सोडून शेती


श्रीनिवास कुमार हे गया जिल्ह्यातील बोधगया ब्लॉकमधील बगदाहा गावचे रहिवासी आहेत. विशेष म्हणजे कुमारला आंतरराष्ट्रीय खेळाडू बनायचे होते. त्याने राष्ट्रीय स्तरावरही अनेक सामने खेळले आहेत. पण, याच दरम्यान वडिलांचा मृत्यू झाला. अशा परिस्थितीत त्यांना अॅथलेटिक्स सोडून गावी येऊन शेती करावी लागली. मात्र, अॅथलेटिक्सदरम्यान बिहार सरकारने श्रीनिवास यांना कॉन्स्टेबलची नोकरीही दिली होती. पण श्रीनिवास यांनी ती नोकरी करण्याऐवजी शेती करणे पसंत केले. अशा परिस्थितीत त्यांनी हवालदाराची नोकरी नाकारली आणि गावात येऊन शेती करण्यास सुरुवात केली.


श्रीनिवास कुमार यांची गावात 30 एकर जमीन आहे. यामध्ये सुरुवातीला त्यांनी भात आणि गहू पेरुन शेती सुरु केली. पण आता शास्त्रज्ञ तंत्रज्ञानाच्या सहाय्याने विविध प्रकारची पिके घेत आहेत. यामुळे त्यांना वर्षाला 30 लाखांहून अधिक उत्पन्न मिळत आहे. सध्या गावात पारंपरिक पिकांच्या लागवडीसोबतच श्रीनिवास कुमार फुलांची रोपवाटिकाही तयार करत आहेत. याशिवाय, ते गांडूळ खताची निर्मितीही करत आहेत. यातून त्यांना लाखो रुपयांची कमाईही होत आहे. याशिवाय तो एक दुग्धव्यवसायही चालवत आहे.


श्रीनिवास कुमार यांची संपूर्ण गया जिल्ह्यात चर्चा 


आपल्या मेहनतीने श्रीनिवास कुमार हे एक यशस्वी शेतकरी बनले आहेत. त्याची संपूर्ण गया जिल्ह्यात चर्चा होत आहे. त्यामुळेच संपूर्ण बिहारमधून प्रगतीशील शेतकरी त्यांची शेती पद्धती पाहण्यासाठी येत आहेत. आज ते शेतीतून महिन्याला सुमारे तीन लाख रुपये कमावत आहेत.


महत्त्वाच्या बातम्या:


Success Story: गायींसाठी सोडली लाखोंची नोकरी, दोन गायीपासून सुरुवात; आज सहा कोटींची उलाढाल