Agri Shopping Mall : राज्यातील शेतऱ्यांसाठी एकआंनददायीबातमीसमोरआलीआहे. शेतकऱ्यांचा शेतमाल विकण्यासाठी आता राज्यातील प्रत्येक टोल नाक्यावर कृषी मॉल (Agri Mall at the Toll Plaza) उभारला जाणार आहे. राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने (Maharashtra PWD) यासंदर्भात पुढाकार घेतहेमोठपाऊल उचललं आहे. शेतकऱ्यांसाठीच्याया मॉलमधून शेतकरी आपला शेतमाल थेटग्राहकांनाविकूशकणारआहे. शेतातून थेट टोल नाक्यावर शेतमाल विकण्याचीमोठीसंधीयामुळे शेतकऱ्यांनामिळणारआहे. यामुळेवेळ, अधिकचाप्रवासखर्चआणि शेतकऱ्यांचेश्रमदेखीलवाचणारआहे. तर प्रवासी या टोल नाक्यावरील माॅलमधून ताजी भाजी आणि शेतमाल विकत घेतायेणारअसल्याने ग्राहकांच्यादृष्टीनेदेखीलतेअधिकसोयीचेहोणारआहे.

ग्राहकांनाही मार्केटपेक्षा स्वस्त आणि ताजी भाजी मिळणार (Agri Mall at the Toll Plaza)

दरम्यान, शेताच्या जवळ विक्री केंद्र असल्याने याचा फायदा शेतक-यांना होणार आहे. तर मार्केटपेक्षा स्वस्त आणि ताजी भाजी मिळत असल्याने ग्राहनाकांही याचा फायदा होणार आहे. यासाठी प्रत्येक टोल नाक्यावर सार्वजनिक बांधकाम विभाग शेतमालासाठी माॅल बांधणार असल्याचीमाहितीआहे. याआधी भाजप सरकारने शहरात आठवडी बाजार सुरु करुन शेतकऱ्यांना नवीन बाजारपेठ तयार केली होती. त्यानंतरहामोठानिर्णयघेण्यातआलाअसूनयामुळेशेतकरी वर्गातूनसमाधानव्यक्तकेलंजातआहे.

Bhandara : अवकाळी पावसानं कापणीला आलेलं भातपीक भुईसपाट; भंडाऱ्यातील शेतकऱ्यांवर आर्थिक संकट

भंडाऱ्यात काल सायंकाळच्या सुमारास वादळीवारा आणि मेघगर्जनेसह काही भागात गारपीट झाली. कुठं हलक्या तर, कुठं जोरदार आलेल्या अवकाळी पावसानं कापणीला आलेलं भातपीक अक्षरश: जमिनीवर झोपलं. अवकाळी पावसाच्या माऱ्यामुळं भात पिकाची लोंबी गळून पडली तर, अनेक शेतातील उभं भातपीक शेतात झोपल्यानं शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळलं आहे. नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून आर्थिक मोबदला द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Buldhana: खरीप हंगामासाठी बुलढाणा जिल्ह्यात 74000 मेट्रिक टन खतसाठा उपलब्ध, कृषी विभागाची माहिती.

 आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्यात खतसाठ्याची स्थिती समाधानकारक असली तरी मात्र खतांचा काळाबाजार अद्यापही सुरू असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. सध्या जिल्ह्यात 74, 181 मेट्रिक टन खतसाठा उपलब्ध असून त्यातील एक लाख 91 हजार मेट्रिक टन खताच्या आवर्तनाला मंजुरी देण्यात आल्याची माहिती कृषी विभागाने दिली. पेरणीच्या तोंडावर खतांची कमतरता भासण्याची भीती व्यक्त होत असताना सध्या जरी साठा समाधानकारक असला तरी मात्र बुलढाणा जिल्ह्यात खतांचा काळाबाजार सुरू असल्याच्या घटना घडत आहेत. यावर कृषी अधीक्षक व कृषी विभाग चाप लावण्यास अपयशी ठरल्याच समोर आल आहे.

इतर महत्वाच्या बातम्या