Nandurbar Agriculture News : नंदूरबार (Nandurbar) जिल्ह्यातील एका गावात निसर्गाची वेगळीच किमया पाहायला मिळत आहे. नवापूर तालुक्यातील पानबारा (Panbara) या गावातील शेतात एका आंब्याच्या झाडाला (Mango tree) बाराही महिने आंबे येत आहेत. या झाडाला बारमाही आंबे येत असल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. पानबारा गावातील सुरेश गावित यांच्या शेतात हे आंब्याचे झाड आहे.
नवापूर तालुक्यातील पानबारा गावात महामार्गालगत असलेल्या शेतात हे आंब्याचे झाड आहे. या झाडाला बाराही महिने आंबे येत असल्यानं नागरिक आश्चर्य व्यक्त करत आहेत. पानबारा गावातील शेत मालक सुरेश गावित यांच्या आईने आपल्या घराजवळील कलमी आंब्याचे रोप 90 च्या दशकात शेतात लावले होते. आज त्या झाडाला बाराही महिने आंबे येत आहे. 1990 साली हे झाड लावण्यात आलं होतं. त्यानंतर 2016 सालापासून या आंब्याच्या झाडाला बाराही महिने आंबे यायला सुरुवात झाली. या आंब्याची विक्री करुन शेतमालक आपला उदरनिर्वाह करत आहेत. तसेच नातेवाईकांना देखील आंबे खाण्यासाठी देत आहेत.
दरम्यान, या आंबाल्या बारही महिने आंबे का येतात असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यामागे नेमके काय कारण असल्याचा प्रश्न सर्वांनाच पडला होता. मात्र, यासंदर्भात नवापूर तालुका कृषी अधिकारी बापू गावीत यांनी माहिती दिली आहे. या आंबाच्या वृक्षाला जमिनीतून आवश्यक अन्न घटक मिळत असल्याने तेथील वातावरण अनुकूल असल्यामुळं आंब्याच्या झाडाला बाराही महिने फळे येऊ शकतात, अशी माहिती यावेळी कृषी अधिकारी बापू गावीत यांनी दिली. या आंब्याच्या झाडाला कायम आंबे येतात. यामुळं मला फायदा होत असल्याची माहिती सदर शेतकऱ्याने दिली आहे.
दरम्यान, आंबा हे सर्वांनाच आवडणारे फळ आहे. मात्र, हे आंब्याचे फळ दरवर्षी विशिष्ट महिन्यांमध्ये येत असते. मात्र, नंदूरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील पानबारा गावात एका झाडाला बारमाही आंबा येतअसल्याने सगळेच आश्चर्य व्यक्त करत आहे.
महत्त्वाच्या बातम्या: