एक्स्प्लोर

Maharashtra SSC 10th result 2022 live : नेरळमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांने केली आत्महत्या, लोकलखाली दिला जीव

Maharashtra ssc 10th Result 2022 LIVE Updates : दहावी परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार आहे. आज दुपारी एक वाजता निकाल ऑनलाईन जाहीर होईल. विद्यार्थ्यांना marathi.abplive.com वरही निकाल पाहता येणार आहे.

LIVE

Key Events
Maharashtra SSC 10th result 2022 live : नेरळमध्ये  दहावीच्या विद्यार्थ्यांने केली आत्महत्या, लोकलखाली दिला जीव

Background

SSC 10th Result 2022 : बारावीच्या (HSC Result 2022) निकालानंतर दहावीचा (SSC Result 2022) निकाल कधी लागणार? याबाबत विद्यार्थी आणि पालकांमध्ये कमालीची उत्सुकता होती, मात्र आता ही प्रतीक्षा संपली आहे. कारण, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल आज, 17 जून 2022 रोजी जाहीर करण्यात येणार आहे. आज दुपारी एक वाजता निकाल ऑनलाइन जाहीर होणार आहे. विद्यार्थी आणि पालकांना दहावीचा निकाल ऑनलाइन पाहता येणार आहे. विद्यार्थ्यांना नेमकं कुठे आणि कसा निकाल पाहता येणार? त्यासाठी फक्त काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागणार आहेत. जाणून घ्या

आज दहावीचा निकाल,  दुपारी 1 वाजता ऑनलाईन निकाल लागणार

महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता दहावीचा निकाल आज लागणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर 'ABP Majha'च्या वेबसाईटवर तुमचा निकाल पाहता येणार आहे. एबीपी माझाची अधिकृत वेबसाईट marathi.abplive.com वर दहावीचे विद्यार्थी झटपट आपला निकाल पाहू शकणार आहेत. त्याशिवाय,  MH10.ABPMajha.Com लिंकवर क्लिक करून थेट निकाल पाहता येणार आहे. दहावीच्या परीक्षेला 16,38, 964  विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी 8,89, 506  मुलं असून मुलींची संख्या 7, 49, 458  एवढी आहे. आज दुपारी 1 वाजता ऑनलाईन निकाल पाहता येणार आहे. एबीपी माझाच्या वेबसाईटवरही विद्यार्थ्यांना जलद निकाल पाहता येणार आहे.

निकाल जाहीर झाल्यानंतर कसा चेक कराल?

स्टेप 1 : https://marathi.abplive.com/ वर लॉन ऑन करा
स्टेप 2 : दहावी निकालाच्या बॅनरवर क्लिक करा
स्टेप 3 : तिथं असलेल्या बॉक्समध्ये आपला सीट नंबर टाका
स्टेप 4 : तुमच्या आईच्या नावातील पहिली तीन अक्षरं लिहा
स्टेप 5 : एंटर केल्यानंतर तुमचा निकाल स्क्रिनवर दिसेल 
स्टेप 6 : निकालाची प्रिंट आऊट घ्या किंवा मोबाईलमध्ये सेव्ह करा

दहावीच्या परीक्षेत 1,449,660 विद्यार्थी सहभागी

दहावीची परीक्षा 15 मार्च ते 4 एप्रिल दरम्यान घेण्यात आली होती. यामध्ये सुमारे 1,449,660 विद्यार्थी सहभागी झाले होते. दहावीच्या परीक्षेसाठी एकूण 16 लाख 39 हजार 172 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यामध्ये 8 लाख 89 हजार 584 विद्यार्थी तर 7 लाख 49 हजार 487 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यामुळे दहावीचा निकाल कधी लागणार याकडे विद्यार्थी आणि पालक डोळे लावून बसले होत. गेल्या महिन्यात राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी महाराष्ट्र दहावीचा निकाल 20 जूनपर्यंत जाहीर केला जाईल, असं सांगितलं होतं. अखेर आज म्हणजेच 17 जून रोजी निकाल जाहीर होणार आहे. 

21:50 PM (IST)  •  17 Jun 2022

SSC Exam : नेरळमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांने केली आत्महत्या, लोकलखाली दिला जीव

SSC Exam : दहावीत मार्क कमी मिळाले म्हणून नेरळ येथील एका विद्यार्थ्याने आत्महत्या   केली  आहे. साहिल संभाजी ठोंबरे असे विद्यार्थ्यांचे नाव आहे. 
नेरळ रेल्वे स्थानकादरम्यान लोकल ट्रेनखाली  जीव दिला आहे. साहिल हा नेरळ गावचा रहिवासी आहे.  कर्जत रेल्वे पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

13:42 PM (IST)  •  17 Jun 2022

SSC Result 2022 : विभागात नागपूर जिल्हा अव्वल

नागपूरः नागपूर विभागाचा निकाल 97 टक्के लागला आहे. यात नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांपैकी नागपूर जिल्हा अव्वल ठरला आहे. नागपूर जिल्ह्याचा निकाल 97.93 टक्के, भंडारा जिल्ह्याचा 97.26 टक्के आणि गोंदिया जिल्ह्याचा निकाल 97.07 टक्के लागला आहे.

13:26 PM (IST)  •  17 Jun 2022

Maharashtra SSC 10th Result : दहावीच्या निकालामध्ये कोल्हापूर विभागात 18 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण !

SSC Results 2022 : दहावीच्या परीक्षेत 122 विद्यार्थ्यांनी 100 टक्के गुण मिळवले आहेत. लातूर विभागात सर्वाधिक 70 विद्यार्थ्यांनी 100 टक्के गुण मिळवले. कोल्हापूर विभागातील 18 विद्यार्थ्यांनी 100 टक्के गुण मिळवले आहेत. सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

13:05 PM (IST)  •  17 Jun 2022

SSC Results 2022 : 'माझा'वर दहावीचा ऑनलाइन निकाल जाहीर ; पाहा निकालाचे अपडेट

SSC Results 2022 : 'माझा'वर दहावीचा ऑनलाइन निकाल जाहीर ; पाहा निकालाचे अपडेट

12:41 PM (IST)  •  17 Jun 2022

SSC Result 2022: थोड्याच वेळात ऑनलाइन जाहीर होणार; असा पाहा निकाल

SSC Results 2022 : दहावीच्या विद्यार्थ्यांना दुपारी एक वाजल्यापासून ऑनलाइन निकाल पाहता येणार आहे. ऑनलाइन निकाल पाहण्यासाठी mh10.abpmajha.com या लिंकवर क्लिक करा.

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सVare Nivadnukiche Superfast News 08 PM: लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 29 Sept 2024Uddhav Thackeray Full Speech Nagpur : फडणवीसांच्या होमग्राऊंडवर शिंदे, शाहांवर हल्ला, ठाकरे  UNCUTMahayuti Meeting : महायुतीच्या जागावाटपासंदर्भात वर्षा निवासस्थानी साडेचार तास बैठक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Video:  बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
Video: बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
Pitru Paksha 2024 : पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
Embed widget